सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. आज, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 44,897 रुपये आहे. त्याचबरोबर चांदीची किंमतही सुमारे 0.16 टक्क्यांनी घसरून 65140 रुपयांच्या पातळीवर आली आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे आज सोन्याचे दर घसरल्याचं सांगण्यात येत आहे.
दिल्लीमध्ये आज 24 कॅरेटची किंमत प्रति 10 ग्रॅम 48070 रुपये आहे. तर चेन्नईमध्ये 46150 रुपये, मुंबईत 45030 रुपये आणि कोलकातामध्ये प्रति 10 ग्रॅम 46880 रुपये आहेत.दरम्यान गेल्या काही महिन्यांत सोने 11500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. कोरोना संकटात ते 55 हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचले.
Comments
Loading…