in

Gold-Silver Price| मकरसंक्रांतीला सोन्या-चांदीच्या भावात घसरण

Share

लोकशाही न्यूज नेटवर्क

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. मुंबईत 24 कॅरेट आजचा सोन्याचा भाव 49 हजार 450 रुपये प्रति तोळा आहे. तर, मुंबईत चांदीचा भाव 66 हजार रुपये प्रति किलोवर घसरला आहे. तर, मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 48 हजार 450 रुपये प्रति तोळा इतका आहे. त्यामुळे जर तुम्ही आजच्या दिवशी तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर आताचं खरेदी करा.

एमसीएक्सवर सोन्याची डिलिव्हरी दिसते. यावेळी फेब्रुवारी डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी 395 रुपयांनी घसरुन 48,910 रुपये झाला. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये सोन्याचा भाव 196 रुपयांच्या वाढीसह प्रतितोळा 49,230 रुपयांवर होता. यावेळी चांदीच्या डिलीव्हरीत घट झाली आहे. मार्च डिलीव्हरीसाठी चांदीचा भाव 721 रुपयांनी घसरुन 65,300 रुपये प्रतिकिलो पातळीवर होता.


शहरनिहाय भाव

  • मुंबई – सोने – 49,450 रुपये प्रति तोळा, चांदी – 66,000 रुपये प्रति किलो
  • पुणे – सोने – 49,450 रुपये प्रति तोळा, चांदी – 66,०00 रुपये प्रति किलो
  • जळगाव – सोने – 51,021 प्रति तोळा, चांदी – 66,923 प्रति किलो
  • नागपूर – सोने – 49,450 रुपये प्रति तोळा, चांदी – 66,000 रुपये प्रति किलो
  • नाशिक – सोने – 49,450 रुपये प्रति तोळा, चांदी – 66,000 रुपये प्रति किलो
  • कोल्हापूर – सोने – 50,900 रुपये प्रति तोळा, चांदी – 65,300 रुपये प्रति किलो

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

एका भारतीयाचा जुगाड, चक्क हॉटेलमालकानं अंतराळात पाठवला समोसा

Farmers protest: शत्रुघ्न सिन्हांनी केंद्र सरकारवर डागली तोफ