मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावात चढ उतार पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वस्त होत आहे. परंतु आता सोन्याला पुन्हा झळाळली आल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव (Gold Rate) 112 रुपयांनी वाढून 44,286 रुपयांवर पोहचले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, सोन्याचा भाव आधीच्या व्यापारात प्रति 10 ग्रॅम 44,174 रुपयांवर बंद झाला होता. सोन्याप्रमाणेच चांदीही 126 रुपयांनी वधारून 66,236 रुपयांवर बंद झाली.
बुधवारी जागतिक बाजारपेठेतील किंमत ही देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किमतींपेक्षा वेगळी होती. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रतिऔंस 1711 डॉलरवर आला. चांदी मात्र प्रति औंस 25.78 डॉलरवर स्थिर राहिली. तर चांदीचा वायदा भावही बुधवारी फ्युचर्स मार्केटमध्ये 620 रुपयांनी घसरून 66,860 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021 च्या अर्थसंकल्पातील प्रस्तावांमध्ये सोने आणि चांदीवरील आयात करात मोठी कपात करण्याची घोषणा केली. निर्मला सीतारमण यांनी सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात पाच टक्क्यांनी कपात केली. आता सोन्या-चांदीवरील 12.5 टक्क्यांऐवजी केवळ 7.5 टक्के आयात शुल्क भरावे लागेल. या घोषणेनंतर सोन्या-चांदीच्या किमती कमी होत आहेत.
Comments
Loading…