आज सोन्या-चांदीच्या किमतीत घट झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 140 रुपयांनी सोन्याच्या किंमती घसरल्याचं दिसतं. यामुळे आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46236 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. तर चांदीही शुक्रवारी 68000 रुपये प्रति किलोवर व्यापर करत 8494 रुपयांहून कमी आहे. मागच्या सत्रामध्ये चांदी 68494 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 46145 रुपयांवर पोहोचला आहे. कालही सोन्या-चांदीमध्ये घसरण झाली. गुरुवारी सराफा बाजारात सोनं 717 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सकाळी 11.30 वाजता एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव 176 रुपयांनी वाढलेला दिसून आला. तर चांदीच्या वायदा भावात 88 रुपयांची उसळी नोंदवली गेलो होती. काल सोन्याचा भाव 176 रुपयांच्या वाढीसह प्रति दहा ग्रॅम 46,379 रुपयांच्या भावावर व्यापार करत होता तर एक किलो चांदीची किंमत 69183 रुपये होती.
Comments
Loading…