अनेक आठवड्यांपासून सोन्याच्या भावामध्ये चढ उतारा पाहायला मिळत आहेत. आज दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झालीय, तर चांदीचे भाव आज खाली आलाय. मंगळवारी सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 116 रुपयांनी वाढून 44,374 रुपये झाला. मागील बंद किंमत प्रति 10 ग्रॅम 44,258 रुपये होती.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव संध्याकाळी 4.45 वाजता 2.15 डॉलरच्या तेजीसह (+0.12%) 1,740.25 डॉलर्स प्रति बॅरल होता. देशांतर्गत बाजारातही सोन्याची वाढ दिसून येत आहे. एमसीएक्सवर एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी 66 रुपयांनी वधारून 44,971 रुपयांवर आला.
Comments
Loading…