in

Gold Prices Today : सोन्याचे भाव पुन्हा एकदा वाढले, असे आहेत आजचे दर

Share

गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने भाववाढ होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात एक महिन्यापासून मात्र घसरण पहायला मिळाली. त्यामुळेच एरव्ही पितृपक्षात कमी होणारे सोने-चांदीचे भाव यंदा मात्र वाढत आहे. आठवड्याभरात चांदीचे भाव दीड हजार रुपयांनी वाढून ते ६६ हजार ५०० रुपये प्रतिकिलो तर सोन्याचे भाव ७०० रुपयांनी वाढवून ५२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत.

गेल्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी ६५ हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात वाढ होत जाऊन ती आता ६६ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी ५१ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर असलेल्या सोन्याच्या भावात ७०० रुपयांनी वाढ होऊन ते पुन्हा ५२ हजार रुपयांच्या पुढे जाऊन ५२ हजार २०० रुपये प्रतितोळा झाले आहे.

यंदा उलट चित्र
दरवर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यापासून सोने-चांदीच्या मागणीत घट होऊन त्यांचे भावही घसरतात. त्यात पितृपक्षात तर हे भाव आणखी कमी होतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सुवर्ण बाजारातील अस्थिरतेमुळे पितृपक्षातही सोने-चांदीचे भाव वाढत आहे. दलालांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे सातत्याने भाव अचानक कमी-जास्त होऊन बाजारात अस्थिरता निर्माण होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मोठी बातमी | भारत-चीनच्या सैनिकांमध्ये गोळीबार

18 सप्टेंबरपासून SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलणार