लोकशाही न्यूज नेटवर्क
देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा 36 रुपये तर चांदीच्या दरात प्रति किलो 454 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात किरकोळ वधारले आहेत. सोन्या सोबतच आज चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर प्रति तोळा 47,473 रुपये किंमतीवर ट्रेड करत होते. तर चांदी 68,576 रुपये प्रति किलोग्रॅम होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. चांदीचे दर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिर आहेत. एचडीएफसी सिक्योरिटीजने सोन्याचांदीच्या किंमतीबाबत ही माहिती दिली आहे.
Comments
Loading…