in

Gold Price Today | आज पुन्हा सोन्याच्या किंमतीत वाढ

Share

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वर-खाली होत आहेत. सोन्यात घसरण झाल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी दिसत होते, मात्र आज MCXव डिसेंबरच्या सोन्याच्या किंमतीत 124 रुपयांनी वाढ झाली. मंगळवारी प्रति 10 ग्रॅम 50 हजार 245 रुपयांवर सोन्याचे दर होते, आज 50 हजार 369 रुपये सोने झाले आहे. सकाळी 10 वाजता 131 रुपयांच्या वाढीसह सोनं 50 हजार 376 रुपयांवर ट्रेड करत होता. फेब्रुवारीच्या सोन्याच्या किंमतीही 202 रुपयांनी वाढल्या.

मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याची किंमत कमी होऊन 52 हजारांच्या खाली आली होती. या दरम्यान चांदीचे दर 875 रुपयांनी उतरले होते. मागील सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 52 हजार 122 रुपये होते. तर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति औंस 1919 डॉलर होता तर चांदीची किंमत 24.89 डॉलर प्रति औंस होती.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मेट्रो कारशेडच्या नव्या जागेची आदित्य ठाकरेंनी केली पाहणी

हैदराबादमध्ये पावसामुळे संरक्षण भिंत कोसळून नऊ जणांचा मृत्यू