लोकशाही न्यूज नेटवर्क
यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याचे भाव दोनवेळा घसरले आहेत. भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत झपाट्याने घट होताना दिसत आहे.
आज दहा ग्रॅम 0.03 टक्क्यांनी घसरले. याखेरीज चांदीच्या दरातही घट झाली आहे. मार्चमधील चांदीचा वायदा दरदेखील 0.22 रुपये घसरला आहे. फेब्रुवारीच्या सोन्याचा वायदा भाव 14 रुपयांनी घसरून 49,328 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे तर चांदीची किंमत 155 रुपयांनी घसरून 65,400 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.
सोन्याचा भाव हा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये वाढला असल्याचे समजते आहे. स्पॉट गोल्ड ०.२ टक्क्यांनी वाढून १८४७.९६ डॉलर प्रति औंस, तर चांदी ०.८ टक्क्यांनी वाढून २५.११ डॉलर प्रति औंस झालीय.दिल्लीतील सराफा बाजारात सोने 389 रुपयांनी वाढून 48866 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालं. तर मागच्या सत्रात सोने 48477 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालं होतं.
Comments
0 comments