लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत घट झाल्याचं चित्र होतं. पण आता सोन्याच्या दरवाढी सुरू झाली आहे. बुधवारीच्या व्यापार सत्रात सलग चौथ्यांदा सोन्याच्या किमती वाढताना दिसत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सुरुवातीच्या व्यापारात सोन्याच्या वायद्याचे दर 0.2 टक्क्यांनी वाढून 48,046 वर पोहोचले.
सोन्याबरोबरच चांदीचे दरही वाढत आहेत. बुधवारीच्या व्यापारात चांदीचा वायदा भाव 0.25% वाढून 69,860 डॉलर प्रतिकिलो झाला आहे. अर्थसंकल्पानंतर एकीकडे शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याच्या किमतीत जोरदार घसरण झाली. अर्थसंकल्पानंतरही घसरणीचा कल कायम होता, परंतु 5 फेब्रुवारीपासून तेजीचा टप्पा सुरू झाला. अर्थसंकल्पाच्या काळापासून शेअर बाजार स्थिर झाला आहे.
Comments
Loading…