लोकशाही न्यूज नेटवर्क
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअराच्या निर्देशांक 52 हजारांचा टप्पा पार केला, अशातच राष्ट्रीय सराफा बाजारात सोन्याचा भाव 19 रुपयांनी घसरून 47,307 रुपयांवर आला आहे. वाढत्या महागाईच्या काळात सोने मात्र स्वस्त होताना दिसत आहे. सोन्याच्या किंमतीत ०.०२ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1,819 अमेरिकन डॉलरवर आला आहे.
तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. चांदी 646 रुपयांनी वाढून 69,072 रुपये झाली गेल्या सत्रात चांदी 68,426 प्रति किलोवर बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातचांदीची किंमत 27.48 डॉलर प्रति औंस राहिला आहे.
Comments
Loading…