in

सोनं झालं स्वस्त

लोकशाही न्यूज नेटवर्क
दिल्लीत सोन्याच्या भावात १६३ रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव ४६,७३८ रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे. सिक्युरिटीजच्या मते, गेल्या सत्रात सोन्याचा भाव ४६,९०१ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता.

एकीकडे सोन्याच्या भावात घसरण झाली असताना दुसरीकडे चांदी महागली आहे. गेल्या सत्रात चांदीचा भाव ६६,९५३ रुपये प्रति किलोग्रॅम होता. ज्यामध्ये आता ५३० रुपयांनी वाढ झाली असून आता चांदीचा भाव ६७,४८३ रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत स्थितीत पोहोचल्याने सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये ३ पैशांची वाढ होऊन ७२.९३ रुपयांवर बंद झाला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘द फॅमेली मॅन 2’चं प्रदर्शन लांबणीवर

गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण