मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावामध्ये कमालीचा चढ उतार पाहायला मिळाला. आज सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचं पहायला मिळालं तर चांदी महागली आहे. भारताची राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावात १४७ रुपयांनी घसरण होत ४४,०८१ रुपये प्रति १० ग्रॅम इतका भाव झाला आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने सोनं स्वस्त झालं आहे. गुरुवारी सोन्याचा भाव ४४,२२८ रुपपायंवर बंद झाला होता. सोन्याच्या भावात घसरण झाली असताना चांदी महागली आहे. चांदीच्या भावात १,०३६ रुपयांनी वाढ होत ६४,२७६ रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. गुरुवारी चांदीचा भाव ६३,२४० रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.
आज देशांतर्गत शेअर बाजारात सकारात्मक सुरुवातीमुळे भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १४ पैशांनी मजबूत होऊन ७२.४८ वर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,७२६ डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव २५.१४ डॉलर प्रति औंस इतका आहे.
Comments
Loading…