in

गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे यांचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क

सोलापूर येथील गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान दत्तात्रय शिंदे यांचा मृतदेह आज सोमवारी सकाळी मोदी स्मशानभूमीलगत असलेल्या रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. शिंदे यांनी आत्महत्या केली, त्यांचा पुलावरुन पडून अपघाती मृत्यू झाला, की त्यांच्यासोबत घातपात घडला, हे अद्याप अस्पष्ट आहे. यासंबंधी पोलीस अधिक तपास करत आहेत.

भगवान शिंदे हे पहाटे फिरण्यासाठी गेले होते. उशिरापर्यंत ती घरीच परतले नाहीत, त्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मोदी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पुलावरून खाली पडल्याने छिन्ह विच्छिन्न अवस्थेत पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेतला आणि रेल्वे हॉस्पिटलला घेऊन गेले तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ही पाहा, मोदींनी उल्लेख केलेली नवीन ‘आंदोलनजीवी’ जमात, राष्ट्रवादीचा पलटवार

फडणवीसांचा होणार नारायण राणे; राष्ट्रवादीचा टोला