in

मुंबईसाठी आशेचा किरण; स्पुटनिक साठा जून अखेर मिळणार

लसीकरणाची गती वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेने काढलेले ग्लोबल टेंडर रद्द कराव लागले आहे. 9 कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र न ठरल्याने अखेर हे टेंडर रद्द करण्यात आल्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली आहे. त्यामुळे आता सारवासारव म्हणून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पुटनिक साठा जून अखेर मिळणार असल्याची माहिती दिली.

मुंबईसाठी स्पुटनिक लसीचा साठा देण्याची तयारी डॉ. रेड्डीज लॅबने दाखवली आहे. स्पुटनिक लस साठवणुकीचा शितगृहात निकष वेगळे असल्याने हा साठा मिळाल्यानंतर शीतगृहातील साठवणुकीची चाचपणी करण्यात येणार असल्याचे महापौर पेडणेकर म्हणाल्या आहेत.

दरम्यान जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यात स्पुटनिक लसीचा साठा मोठ्या प्रमाणात मुंबईला देण्यात येणार आहे. या संदर्भात येत्या आठ ते 10 दिवसात डॉ. रेड्डीज यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली जाईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Tenancy Act : शिवसेनेचा आदर्श भाडेकरू कायद्याला विरोध…मुंबईत विविध ठिकाणी आंदोलनं

यापुढे लसीच्या प्रमाणपत्रावर मोदींऐवजी ममतांचा फोटो?