in

लग्न करायचं नसल्याने मुलीने मैत्रिणीसोबत सोडलं घर… दोघीही सापडल्या गोव्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क

कारंजा तालुक्यात लग्न करण्यास नकार देत एका मुलीने मैत्रीणीला सोबत घेऊन घर सोडल्याची घटना घडली आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने दोघीही कारंजाला सुखरूप परतल्या आहेत. मुलीच्या घरी लग्नाची चर्चा सुरू होती. मात्र तिचा नकार असल्याने मुलगी मैत्रीणीसोबत निघून गेली. याबाबत तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवली आणि दोन्ही मुलींना गोव्यातील पणजीहून ताब्यात घेतले.

कारंजा (घाडगे) तालुक्यातील दोन अल्पवयीन मुली मैत्रीणी आहे. एकीच्या घरी लग्नाबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र मुलीचा लग्नास नकार असल्याने तिने मैत्रिणीला सोबत घेऊन घर सोडले. मुलगी बेपत्ता असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला. पालकांनी याबाबत कारंजा पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम राबवली. कारंजा येथून नागपूर, नागपुरातून पुण्याला आणि त्या ठिकाणाहून गोव्याला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कारंजा पोलिसांनी तातडीने गोव्यातील पणजी पोलिसांशी संपर्क साधला. पणजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पणजी पोलिसांनीही तातडीने पावले उचलत ज्या ठिकाणी मुली उतरल्या त्या ठिकाणी पोहचले. मात्र मुली उतरलेल्या ठिकाणी नसल्याने पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली. यानंतर पणजी पोलिसांनी त्या दोघींना एका हॉटेलमधून ताब्यात घेतले.

दरम्यान, कारंजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार दारासिंग राजपूत यांनी पोलिसांचे एक पथक गोव्याच्या दिशेने रवाना केले. हे पथक २९ जानेवारी रोजी दोन्ही अल्पवयीन मुलींना कारंजा येथे सुखरूप घेऊन परतले. कारंजा पोलिसांनी वेळेत दखल घेत तपासाला वेग देत मुलींना सुखरूप परत आणले. त्यांनी सोबत नेलेले दागिने देखील पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले आहे.

पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन मोहनधुळे, उपनिरीक्षक सचिन मानकर , यशवंत गोहत्रे, पूजा लोहकरे, निखिल फुटाणे, उमेश खामनकार, विनोद येमबाडे यांनी तपासात सहकार्य केले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भरधाव कंटेनरच्या धडकेने वाहतूक पोलिसाचा मृत्यू