in ,

‘त्या’ कोरोनाच्या संशोधनाची गरज, भाजपा नेते गिरीश महाजनांचे मत

राज्यातील राजेश टोपे, जयंत पाटील, बच्चू कडू या तीन मंत्र्यांसह ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोना झाला आहे. त्यापैकी बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा तर खडसे यांना तिसऱ्यांदा कोरोना झाला आहे. यावरून भाजपा नेते गिरीश महाजन यांनी टिप्पणी केली आहे.

भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या खडसे यांनी 18 फेब्रुवारीला ट्विट करून आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे, अवघ्या चार महिन्यांत त्यांना तिसऱ्यांदा कोरोना झाला आहे. त्यांना सर्वात आधी 19 नोव्हेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. जवळपास महिन्याभरानंतर 31 डिसेंबर रोजी पुन्हा त्यांच्यामध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळली होती. या दरम्यान त्यांना ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी बोलवले होते. नंतर त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.

जळगाव जिल्ह्यातील करोना हा वेगळाच आहे. त्यामुळे तो जास्त काळजी घेण्यासारखा आहे. एकनाथ खडसे यांना तिसऱ्यांदा करोना झाल्याने आम्हाला काळजी वाटत आहे. त्यांना झालेल्या या करोनाची चौकशी तर झाली पाहिजे. तसेच त्यावर संशोधन होण्याची देखील गरज असल्याचे भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

धक्कादायक! अल्पवयीन मुलांना विवस्त्र करून मारहाण; एका विकृताला अटक

कार्यालयीन वेळेची मानसिकता बदलण्याच गरज, धोरण आखण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी