in ,

लहान मुलांना Bike वर बसवतात आता पहा नवे नियम

तुम्हीही आपल्या लहान मुलांना घेऊन प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सुरक्षेच्यादृष्टीने नियमांत काही बदल केले आहेत. केंद्रातील मोदी सरकारने मुलांना बाइकवर बसताना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी नवे नियम केले आहेत.

यापूर्वी मंत्रालयाने बाइकच्या मागच्या सीटवरील दोन्ही बाजूला हँड होल्ड अनिवार्य केलं होतं.
हँड होल्ड मागे बसलेल्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी आहे. बाइक ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावल्यास, हँड होल्ड अशावेळी अतिशय मदतशीर ठरतं.
तसंच याआधी बाइकच्या मागे बसणाऱ्यांसाठी दोन्ही बाजूला पाय ठेण्यासाठी पायदान अनिवार्य केलं होतं.
त्याशिवाय बाइकच्या मागील टायरच्या डाव्या बाजूचा किमान अर्धा भाग झाकण्याची सूचना केली होती, जेणेकरुन मागे बसणाऱ्या व्यक्तीचे कपडे चाकात अडकू नये.

4 वर्षांपर्यतच्या मुलांना बाइकवर मागे बसवताना गाडीचा स्पीड लिमिट ताशी 40 किमीहून अधिक असू नये.मागे बसणाऱ्या 9 महिने ते 4 वर्षांपर्यंतच्या मुलांना क्रॅश हेल्मेट घालणं आवश्यक असणार आहे. –
त्याशिवाय 4 वर्षांपर्यंतच्या मुलांना मागे बसवताना सेफ्टी हार्नेसचा वापर करणंही आवश्यक असणार आहे.

मंत्रालयाने मागवल्या सूचना – सेफ्टी हार्नेस मुलांना घालण्यात येणारं जॅकेट असतं, ज्याची साइज अॅडजस्ट करता येते.यामुळे मुलं बाइक चालकाशी बांधली जाऊ शकतात. सेफ्टी जॅकेटला जोडलेले पट्टे मुलाला आणि ड्रायव्हरला एकत्र ठेवतात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ

‘बविआ’ला धक्का; तीन नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश