in ,

मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिक तयारी अशी कराल!

Share

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या काही दिवसांपासून शाळा सुरु होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावेळी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, लहान मुलांकडून सुरक्षेचे कडक नियम पाळले जातील का?

शाळा सुरु केल्या तर मुलांची तशीच पालकांची त्यांना शाळेत पाठवण्याची मानसिक तयारी आहे का? असे असले तरी शाळा पुन्हा सुरु करण्यासंबंधी अधिकृत सूचना कधीही येऊ शकते. परंतू त्यापूर्वी पालकांना गरज आहे मुलांची मानसिकरुपाने तयार करण्याची. ती कशी करावी? यावर एक नजर…

● विविध नियम पाळणे जातील अशी अपेक्षा आपण मुलांकडून करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना तयार करा, त्याबाबत माहिती द्या.

● मास्क, ग्लोव्ह्ज घालणे, थर्मल स्कॅनिंग, सोशल डिस्टन्सिंगचे पालन याबाबत त्यांच्यी तयारी करून घ्या.

● मुलांशी ईमानदारीने कोरोना आणि त्याच्या गांभीर्यावर चर्चा करा. मात्र हे करताना त्यांच्या वयाचा अंदाज घ्या!

● मुलांना प्राप्त परिस्थितीची सकारात्मक बाजू दाखवा, हे खूप महत्वाचे आहे.

● त्यांना समज द्या की, संसर्गाचा धोका कशा प्रकारे टाळता येऊ शकतो.

● मुलांना हात कसे धुवायचे? लोकांपासून किती लांब रहायचे? तसेच वारंवार तोंडात हात टाकणे किंवा चेहर्‍यावर हात फिरवण्याची सवय कशा प्रकारे सोडवावी हे प्रेमाने समजवून सांगा.

● टिशूचा वापर करुन डस्टबिनमध्ये फेकणे तसेच वारंवार हात धुणे, स्वच्छता बाळगणे याबद्दल सांगावे.

● मुलांना भरपूर प्रश्न विचारु द्या आणि शक्योतर त्याचे सकारात्मक उत्तर द्या.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

SPECIAL| अभिनेत्री रसिका सुनीलसोबत लॉकडाऊन रॅपिड फायर आणि धमाल गप्पा, पाहा…

कोरोना व्हायरस हा चिनचा नव्हेच; ‘या’ देशात आढळला होता पहिला रुग्ण