in

५ वर्षाच्या चिमुकलीने नोंदवलं इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव

जालना जिल्ह्यातील गिता विजय सुर्यवंशी या मुलीनं वयाच्या पाचव्या वर्षी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलंय. तिने दोन्ही हाताने दोन बॉल पकडून एका मिमिटात 220 ट्रिबल्स केलेत. गिता ही मुळची जळगाव जिल्ह्यातली. सुरुवातीपासूनच या चिमुकलीला बास्केट बॉलची आवड आहे. त्यामुळं तिने औरगाबादेतील पंकज सर आणि समाधान सर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षांपासून प्रॅक्टिस केली. घरातल्या लोकांनी खुप सहकार्य केलं त्यामुळंच मी इथपर्यंत पोहोचले असल्याचं गितानं म्हंटलं आहे.

याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.आता आणखी पुढे जाऊन गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करायचं असून खुप सारे पारितोषिकं जिंकायचं स्वप्न गिचाचं आहे. मात्र या कामगिरीमुळं गिताचं सर्वत्र कौतुक होतंय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र रद्द केल्याने शिवसेनेचा जल्लोष