in

चक्क… पेन्सिलपासून साकरला गणपती बाप्पा

प्लास्टर ऑफ पॅरिस आणि मातीपासून सुंदर गणपती बनविल्या जातात. त्यापासून मूर्ती बनविताना फारसे श्रम राहत नाही. तसेच त्यांची कल्पना, रंगरंगोटी, मूर्तीची दिशा, बाजू ही ठरलेलीअसते.

परंतु, एखाद्या वेगळ्या वस्तूंपासून गणपती बनविताना अनेक महिन्यांचा कालावधी लागतो. असाच गणपती मनकर्ना प्लॉट येथील टिल्लू टावरी यांनी तयार केला आहे. नेमका कसा आहे गणपती पाहुयात…अकोला शहरातील मनकर्ना प्लॉट येथील टिल्लू टावरी ते अपंग आहेत, मात्र, त्यांचीविविध वस्तूंपासून गणपती बनविण्यात वेगळी ओळख आहे. यावर्षी त्यांनी चक्क पेन्सिलपासून गणपती बनविला आहे. या गणपतीला बनविण्यात ते गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून परिश्रम घेत आहेत.

विशेष म्हणजे, एकही पेन्सिल न चिकटवता तब्बल पंचवीस हजार पेन्सिलपासून पेन्सिलचा बाप्पा त्यांनी साकारालाय. सध्या हा गणपती अकोल्यात चर्चेचा विषय बनलाय. त्याला कारण ही तसेच आहे. कारण हा बाप्पा मातीचा नसून हापेन्सिलचा बाप्पा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, पण हे खरे आहे.हा गणपती बाप्पा चक्क 25 हजार पेन्सिलपासून बनवलाय. अकोल्यातील अपंग कारागीर टिल्लूटावरी यांनी साकारला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढून निवडणुका घेणार – छगन भूजबळ

ऑनलाईन फूड ऑर्डर महाग होणार , केंद्र सरकार जीएसटी लावण्याच्या तयारीत