in

आर्यन खान प्रकरणातील फरार किरण गोसावी पोलिसांना शरण येणार?

आर्यन खान अटक (aryan Khan arrest case) प्रकरणाला आता नवनवीन वळण मिळाले आहे. क्रुझ ड्रग्ज पार्टीतील पंच केपी गोसावी ऊर्फ किरण गोसावी याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथकं तयार केली आहेत. गोसावी याचं ठिकाण वारंवार बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची ही दोन्ही पथकं परराज्यात रवाना झाली आहेत.

केपी गोसावीच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथकं तयार केल्या आहेत. गोसावी हा परराज्यात दडून बसल्याची माहिती असल्याने त्याच्या शोधासाठी पोलीस परराज्यात रवाना झाली आहेत. गोसावी वारंवार त्याचं लोकेशन बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यास अडचणी निर्माण होत होती. त्याचे शेवटचे लोकेशन आगरतळा येथील होते. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, किरण गोसावी हा स्वतःहून पोलिसांना शरण येणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

धर्मांतर केलं नाही, पण सासू मुस्लिम होती; क्रांती रेडकरचं धर्मांतराच्या आरोपावर उत्तर

हजारो भाविकांच्या उपस्थित श्री विठ्ठल बिरदेव यात्रा पडली पार