in

वसई विरार महापालिकेच्या केंद्रावर फ्रंटलाइन सीफेरर्सचे प्राधान्यक्रमाने होणार लसीकरण

वसई – विरार परिसरात राहणाऱ्या सर्व फ्रंटलाइन सीफेरर्सचे आता महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर प्राधान्यक्रमाने लसीकरण होणार आहे. या सबंधित परिपत्रक नुकतेच वैद्यकीय आरोग्य विभागाने जारी केले आहे. त्यामुळे शहरातील सीफेरर्सना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच ऑल इंडिया सिफेरर्स यूनियनच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

ऑल इंडिया सिफेरर्स यूनियनचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रशांत पाटील आणि कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी पालिका आयुक्त गंगाथरण डी यांची भेट घेऊन फ्रंटलाइन सीफेरर्सचे प्राधान्याने लसीकरणास मान्यता द्यावी, या सबंधित निवेदन दिले होते. या निवेदनाला आयुक्तांनी मान्यता देत, सर्व सीफेरर्सना तत्काळ लस उपलब्ध करून देण्यासाठी विशेष निर्देश वैद्यकीय आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यामुळे आता वसई विरार महापालिका हद्दीतील पात्र लाभार्थ्यांना महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रामध्ये जाऊन कोव्हिड 19 प्रतिबंधक लसीकरण करून घेता येईल. सदर लाभार्थ्यांनी आपले ओळखपत्र व फ्रंटलाईन वर्कर म्हणून अनेक्सर 1 अन्वयेचा फॉर्म भरून सादर करावा लागणारा आहे.

वसई विरार मधील सर्व सीफेरर्सचे लसीकरण होणार जलद गतीने होणार असून फॉर्म आणि लसीकरण केंद्र महिती साठी ऑल इंडिया सीफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशांत पाटील यांनी केले आहे.

लसीकरणात प्राधान्य

गेल्या वर्षीपासून आमच्या सीफेरर्सची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे, म्हणून लसीकरण फार महत्वाचे आहे. १८ ते ४५ वर्षे वयोगटात अंदाजे २.५ लाख सीफेरर्स आहेत ज्यांना भारतीय बनावटीची लस, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन ही १ मे पासून मिळणार होती. परंतु साठ्यांच्या कमतरतेमुळे अनेक राज्यात ही मोहीम पुढे ढकलण्यास भाग पाडले आहे. पुन्हा, येथे काही देशांनी कोव्हॅक्सिन घेतलेल्या प्रवाशाला परवानगी देत नाही. आम्हाला सीफेरर्ससाठी अधिक लसीकरण केंद्रांची आवश्यकता आहे, संपूर्ण देशात फक्त १२ बंदरांची रुग्णालये आहेत, प्रामुख्याने एक राज्य एक रुग्णालय आहे, युनियनने अधिक रूग्णालयांची विनंती केली आहे, ड्राइव इन लसीकरण मोहीम, वसतिगृहांमध्ये लसीकरण शिबिर, सीफेरर्स प्रामुख्याने ज्या भागात निवास करतात तेथे अशा इतर पर्याय सुचवण्यात आले आहेत. या सर्व बाबी फार गरजेच्या आहेत यावर तातडीने ठोस पावलं घेणे ही काळाची गरज आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे साधला जनतेशी संवाद

मुंबईतील नामांकित हॉटेलमध्ये महापौरांची धड, लसीकरणाबाबत गंभीर बाबींचा खुलासा