लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंह याच्या विरोधात हरयाणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी (2020) एका इंस्टाग्राम लाईव्हदरम्यान युवराजने दलित समाजाबाबत एक आक्षेपार्ह कमेंट केली होती. युवराजची ही कमेंट दलित समाजाचा अपमान करणारी असल्याचा दावा करत दलित ह्युमन राईट्सचे संयोजक रजत कलसन यांनी युवराज विरोधात हरयाणा पोलिसांनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या वर्षी इंस्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यान युजवेंद्र चहलबाबत बोलताना युवराजने जातीवादी शब्द वापरले होते. यानंतर युवराजवर त्याच्या या टिप्पणीसाठी मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली होती. प्रकरणानंतर युवराजने माफीदेखील मागितली होती. दरम्यान, युवराजच्या त्या जातीवादी वक्तव्यामुळे त्याच्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम 153, 153 (अ), 505, 295 आणि एससी / एसटी कायद्यासंबंधित कलमांतर्गत युवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Loading…