in

अमरावतीत अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार; बदनामीच्या भीतीनं मुलीने संपवलं जीवन

अमरावतीमधून धक्कादायक बातमी समोर येती आहे. अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नाही. पुन्हा एकदा दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अल्पवयीन ही १७ वर्षाची आहे. यातून अल्पवयीन ७ महिन्याची गर्भवती असताना बदनामीच्या भीती पोटी तिने स्वतः ला गळफास लावून घेतला. सध्या येवदा पोलिसांनी या नराधमास ताब्यात घेतले आहे. तर पोस्को अंतर्गत गुन्हे देखील दाखल केलेत. या संदर्भात अधिक तपास येवदा पोलीस करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधानांच्या उपस्थितीत कोरोना स्थितीवर उच्चस्तरीय बैठक

अमरावतीत कापूस खरेदीचा श्री गणेशा…