शिवजयंतीनिमित्त शिवभक्तांना रायगडावर जाऊन शिवरायांचे दर्शन घेण्याची आतुरता लागते. यावेळी रायगडावरील प्रवेशासाठी शुल्क आकारले जायचे. मात्र यावर्षी शिवभक्तांना निशुल्क प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे शिवभक्तांसाठी दिलासादायक बातमी आहे.
शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. या दोन दिवसांत रायगडावर 24 तास प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्व विभागाकडे मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या 24 तासात पुरातत्व विभागानं मान्यता दिली. दरम्यान एरवी किल्ल्यावर सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किल्ल्यावर पर्यटकांना परवानगी असायची मात्र दोन दिवस सुट देण्यात आली आहे.
नियमावली
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला अवघ्या दहा लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली होती. त्यावर विरोधकांनी टीका केल्यानंतर नवी नियमावली जारी करून शिवजयंतीला आता 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली. राज्य शासनाच्या गृहविभागाने हे नवीन परिपत्रक जारी केलं आहे. तसेच शिवजयंती दिनी मुंबईत कलम 144 लागू केलं आहे. त्यामुळे मराठा संघटना आणि शिवभक्त अधिक आक्रमक झाले आहेत.
Comments
Loading…