in

मनसेने चाकरमान्यांसाठी ठाणे,मिरा-भाईदर मधून सोडल्या मोफत बस

Share

गणेशोत्सवानिमित्त एकीकडे कोकणाचे राजकारण तापत असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चाकरमान्यांसाठीच्या मोफत बस सेवेचा शुभारंभ केला आहे. ठाणे आणि मीरा भाईदर मधून या बस सोडण्यात आल्या आहेत. यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मनसे नेते अभिजित पानसे, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत या बसचा शुभारंभ झाला आहे. या निमित्त मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं कि, जिथं सरकार कमी पडतं तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे येतं, सरकार अपयशी ठरल्यामुळे आम्हाला लोकांसाठी सुविधा करावी लागते. परप्रांतीयांसाठी हे सरकार विशेष रेल्वे आणि एसटी मार्फत सीमेपर्यंत सोडते.. मग मराठी माणसांनाच यापासून वंचित का असा सवाल मनसे नेते अभिजित पानसे यांनी सरकारला केला आहे.

मीरा भाईंदर मधून 2 बस कोकणासाठी रवाना

मीरा भाईंदर मधून 2 बस कोकणवासीयांना घेऊन रवाना झाल्या आहेत.भाईंदर पूर्वच्या नवघर नाक्यावरून सावंतवाडी, संगमेश्वर साठी 2 बस चाकरमान्यांना घेऊन निघाल्या. मनसे नेते संदीप राणे तसंच अनिल रनावडे यांनी शुभारंभ केला असून अधिक बस कोकणातील चाकरमान्यांसाठी सोडणार असल्याची माहिती मनसे नेत्यानी दिली.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Today is the last day for the servants to reach Konkan

कोकणात पोहचण्यासाठी चाकरमान्यांचा आजचा शेवटचा दिवस

Torrential rain in 48 hours; Orange alert to three districts

48 तासांत मुसळधार पाऊस; तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट