in

‘या’ शहरात मिळतेय कोरोना लस घेणाऱ्यांना मोफत बिअर

देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोरोना लसीकरण मोहीमेला जनतेकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा यासाठी जनजागृती कार्यक्रम केले जात आहे. अशातच गुरुग्राममधील एका हॉटेल मालकाने कोरोना लसीकरण करून घेणाऱ्या ग्राहकांना मोफत बिअर देण्याची धमाकेदार ऑफर आणली आहे. ग्राहकांनी लसीकरण केल्याचं कागदपत्र रेस्टॉरंटमध्ये दाखवून ते या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

‘इंडियन ग्रील रूम’ या दिल्ली जवळच्या गुरुग्राममध्ये असलेल्या रेस्टॉरंटने कोरोना लस घेतल्याचं कार्ड दाखवल्यानंतर एक बियर मोफत देण्याचं घोषित केलं आहे. तसेच 5 एप्रिल पासून या ऑफरला सुरुवात झाली असून नागरिकांकडून या ऑफरला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं जात आहे.

देशातील अनेक भागांमध्ये लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. तसेच इंडियन ग्रील रूम या रेस्टॉरंटची ऑफर म्हणजे मद्यपींसाठी एक प्रकारे पर्वणीच असल्याचं बोललं जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sachin Vaze | अँटिलिया प्रकरण सोडाच…वाझेची याहून मोठी प्लानिंग होती!

Weekend Lockdown: जाणून घ्या… सोप्या शब्दात नियमावली!