in

तीन लाखापर्यत शून्य टक्के व्याजाची फसवी योजना – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2021-22 सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांची निराशा करणार बजेट असून, हे बजेट मुंबई महापालिकेचे बजेट होत का ? असा सवाल अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

राज्याचा अर्थसंकल्प हा शेतकरी, कष्टकरी, तरुण वर्गाची निराशा करणारा बजेट आहे. अर्थसंकल्पातून सामन्यांची निराशा करणारा असल्याची टीका फडणवीस यांनी केली.एका विशिष्ठ भागाचा अर्थसंकल्प म्हणायचा का असे म्हणत, हे बजेट मुंबई महापालिकेचे बजेट होते का ? असा सवाल फडणवीस यांनी केला. तसेच अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना तीन लाखापर्यत शून्य टक्के व्याज देण्याची घोषणा करण्यात आली. ही योजना फसवी असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यातील 80 शेतकरी 50 हजारापर्यंतचे कर्ज घेतात. त्यामुळे याचा लाभ शेतकऱ्यांना होईल असे वाटत नाही. त्यामुळे केवळ नावापूर्तीची ही घोषणा फसवी असल्याची खरमरीत टीका फडणवीस यांनी केली.

नांदेड जालना रस्ता 6 हजार कोटी केंद्राची योजना, प्रधानमंत्री सिंचन आणि बळीराजा सिंचन योजणा असो, या योजना केंद्राच्या मदतीने होणार आहे. यासाठी भरीव निधी केंद्र सरकार देतेय. त्यामुळे एकीकडे केंद्राला नाव ठेवायची आणि त्यांच्या योजनाची घोषणा करायची अशी भूमिका सरकार राबवत असल्याचा घणाघाता फडणवीस यांनी केला.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विधानसभेत खळबळ! विधिमंडळातील 36 कर्मचारी, नेते कोरोनाबाधित

राज्यात दारू महागणार… उत्पादन शुल्कात वाढ