in

निवडणुका रद्द झालेल्या राज्यातील चार ग्रामपंचायतींसाठी 12 मार्चला मतदान

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम, चार ग्रामपंचायतीच्या निवडणूक, नाशिक नंदुरबार अहमनदनगर निवडणूक, four grampanchayat election,, grampanchayat, Nashik, Nandurbar, Ahmednagar

लोकशाही न्यूज नेटवर्क

विविध कारणांमुळे निवडणूक रद्द झालेल्या राज्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नव्या कार्यक्रमानुसार 12 मार्च रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर साकत (ता. जामखेड) ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 2 साठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) व कातरणी (ता. येवला), नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) आणि अहमदनगर जिल्ह्यातील वाकी (ता. जामखेड) या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. यापैकी उमराणे, कातरणी आणि खोंडामळी ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार होते; परंतु सदस्य व सरपंचपदांच्या लिलावप्रकरणी या तिन्ही ठिकाणी निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्याचबरोबर वाकी ग्रामपंचायतीची आणि साकत ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 2मधील निवडणूक नि:पक्षपणे पार न पडल्यामुळे रद्द करण्यात आली होती.

आता या सर्वांसाठी नव्या निवडणूक कार्यक्रमानुसार 16 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. त्यांची छाननी 24 फेब्रुवारी रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 26 फेब्रुवारी असेल आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 12 मार्च रोजी होईल व मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी लगेचच मतमोजणी होईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तरुणांनी एसटीच पळवून नेली ; प्रशासन हादरलं

Farmers Protest : हरयाणा जिल्ह्यांमध्ये 5 फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट सेवा बंद