in

Jaswant Singh Passed Away;माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन

Share

माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे आज निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. या निधनाच्या वृत्तानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

जसवंत सिंह यांना २५ जून रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह होता. अशी माहिती दिल्लीतील आर्मी हॉस्पिटलच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून दुःख व्यक्त केले. ते ट्वीटमध्ये म्हणतात, जसवंत सिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे.भाजपाला बळकट करण्यासाठी देखील मोठे योगदान दिले. मी सदैव आमच्यात झालेला संवाद स्मरणात ठेवेल. त्यांचा परिवार व समर्थकांच्या दुःखात मी सहभागी आहे” असं देखील पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

भाजप नेत्या उमा भारती कोरोना पॉझिटीव्ह

पुणेकरांचा थेट मोदींनाच सवाल; लसीसाठी 80 हजार कोटी आहेत का?