in

राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन

Share

कोरोनामुळे अभिनेत्यासह, राजकीय नेते व सामान्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण सुरू असताना आता आणखीन एका बड्या व्यक्तीच कोरोनामूळे मृत्यू झाला आहे. माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं करोनामुळे निधन झाले आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळत आहे.

कोण आहेत नीला सत्यनारायण?

निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होती. नीला सत्यनारायण 1972 आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या.नीला सत्यनारायण आपल्या रुक्ष आणि अतिशय धकाधकीच्या कामात व्यग्र असतानाही त्यांनी आपली संवेदनशीलता जोपासली होती. लेखनातून त्या नेहमी व्यक्त होत राहिल्या. कवयित्री म्हणून त्या अधिक परिचित असल्या, तरी त्यांचे स्तंभलेखनही अनेकांना आवडत होतं.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Maharashtra Board HSC Result 2020 | 12वीचा आज निकाल;या वेबसाईटवर पाहता येणार

…तर आयुक्तांनी ठाकुरांनी दाखवलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करुन दाखवावी-अविनाश जाधव