in ,

Manmohan Singh;माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोना संसर्ग झाला आहे. दिल्लीतील एम्समध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले आहे.त्याची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर उपचार करत आहेत.

देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वचजण कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याचे दिसत आहेत.त्यात आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मनमोहन सिंग यांनी लसीकरणाची गती वाढवण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहले होते.

खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग लवकर बरे व्हा, या आशयाचे ट्वीट केले आहे. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा मनमोहन सिंग लवकर बरे व्हा असे ट्वीट केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sanjay Raut | खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण गुलदस्त्यात

CSK Vs RR | चेन्नईच्या फलंदाजीला सुरुवात; गायकवाड-डुप्लेसी मैदानात