in

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन

Former President Pranab Mukherjee passes away
Former President Pranab Mukherjee passes away
Share

देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांचे आज (31 ऑगस्ट) निधन झाले. पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची दु:खद बातमी दिली. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणब मुखर्जी यांचा कोरोना रिपोर्ट पॉ़झिटीव्ह आला होता. त्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वीच दिल्लीतल्या आर्मी रुग्णालयात उपचाराखातर दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्राध्यापक-पत्रकार ते राष्ट्रपती असा प्रणबदांचा राजकीय प्रवास जाणून घेऊयात.

गेली पाच दशकं देशाच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केलेलं व्यक्तिमत्व… एक प्राध्यापक-पत्रकार म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला… त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 साली पश्चिम बंगालच्या वीरभूम जिह्यातील मिराती गावात झाला… राजकारण आणि देशभक्तीचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं… इतिहास आणि समाजशास्त्र हे विषय घेऊन कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं… त्यानंतर कायद्याची पदवी घेऊन काही काळ वकीलीही केली… एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केलं… कालांतरानं वडिलांच्या मार्गदर्शनातून ते काँग्रेस पक्षात सक्रीय झाले…

राजकीय कारकीर्द

1982 ते 1984 – अर्थमंत्री

1980 ते 1985 – राज्यसभेचे नेते

1991 – नियोजन आयोगाचे अध्यक्ष

1995 – परराष्ट्र मंत्री

2004 – लोकसभा निवडणुकीत विजय

2004 ते 2006 – संरक्षण मंत्री

2006 ते 2009 – परराष्ट्र मंत्री

2009 ते 2012 – अर्थमंत्री

2012 ते 2017 – राष्ट्रपती

25 जुलै 2017 ला राष्ट्रपती पदाचा कार्यभार संपुष्टात.

पुरस्कार प्राप्त

1997 – उत्कृष्ट संसदपट्टू म्हणून गौरव

2007 – पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित

 2013 – राष्ट्रपतीपदाची धुरा

 2019 – भारतरत्न प्रदान

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Students taking NEET and JEE exams will be allowed local travel

NEET आणि JEE परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची राहणार मुभा

The crisis on the world economy due to the corona virus

कोरोना विषाणूमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर संकट