in ,

नागपुरातील सतरंजीपुरात सक्तीनं क्वारंटाईन, तब्बल १२०० जणांना ३० बसनं सेंटरला नेलं

Share

नागपूर: कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरा भागातील तब्बल १२०० लोकांना महापालिकेच्या वतीनं रात्री सक्तीनं क्वारंटाइन करण्यात आलं. ३० बसेसच्या माध्यमातून सर्वांना क्वारंटाइन सेंटर पर्यंत नेण्यात आलं. त्यामुळं या भागात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. या भागातील ६८ वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या मृत्यु झाल्यावर या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं परिसरातील जवळपास ८० जणांना कोरोनाची लागण झाली.

त्यामुळं नागपूर महानगरपालिकेची चमू दररोज या परिसरात सर्व्हेक्षण करतं आहे. मात्र, अजूनही नागरिक संपूर्ण माहिती देत नसल्याची बाब पुढं आली. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील सुमारे २०० च्या वर नागरिकांनीही अशीच माहिती लपविली होती. त्यांना वेळीच विलगीकरण कक्षात पाठविल्यानं मोठा संसर्ग टळला.

त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खरी माहिती लपविली तर तेथून अनेक नागरिक पॉझिटिव्ह निघू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं या भागातील १२०० जणांना सक्तीनं क्वारंटाइन करून ठेवण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालली होती.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

अर्थव्यवस्था सुरळीत व्हायला सुरुवात, रत्नागिरीची मच्छी मुंबई-गोव्याच्या मार्केटमध्ये

भाजप नेत्याच्या घरी चित्तथरारक गोळीबार; दोन मुलांवर गोळ्या झाडून पित्याने केली आत्महत्या