in , ,

मोदी सरकारसाठी शेतकरी, जवान नाही तर 3 ते 4 उद्दोगपती देव – राहुल गांधी

लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्पेवरुन काँग्रेस नेते व खा. राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने सरकारवर टीका केली आहे की, अर्थसंकल्प हा शेतकरी आणि जवानांच्या फायद्याचा नसून केवळ उद्दोगपतींच्या फायद्याचा आहे.

काही उद्दोगपतींचे हित डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात सैंनिकांच्या पेन्शनमध्ये कपात करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करुन म्हटले आहे की, “जवान आणि शेतकरी नाहीत तर मोदी सरकारसाठी केवळ तीन-चार उद्दोगपती देव आहेत.

अर्थसंकल्पात सैंनिकांच्या पेन्शनमध्ये कपात करण्यात आली आहे” राहुल गांधी यांनी याच्याअगोदर देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन सरकारवर “मोदी सरकारने देश आणि घर या दोन्हींचे बजेट बिघडवले आहे. असे म्हणत टीका केली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जालनात शिवसेना कार्यकर्त्याला गाडीसह जाळले

‘एमएसपी’वर कायदा बनल्यास शेतकऱ्यांना फायदा’ – राकेश टिकैत