लोकशाही न्यूज नेटवर्क | अर्थसंकल्प असो वा शेतकर्यांशी संबंधित प्रश्न कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रत्येक आघाडीवर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आपली भूमिका मांडतील. यामुळे आजच्या लोकसभेच्या कामकाजाकडे सर्वांचं लक्ष्य लागले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत पंतप्रधान मोदींनी कृषी कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती. यादरम्यान त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आता आज पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी लोकसभेत भाषण करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर ते भाष्य करतील.
दरम्यान राहुल गांधी अर्थसंकल्प, शेतकरी संबंधित प्रश्न, भारत-चीन सीमा तणाव अशा अनेक मुद्यावरून सरकारला धारेवर धरत आहेत. त्यामुळे राहुल गांधी मोदी सरकारवर कसा हल्लाबोल करतात याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Comments
Loading…