in

तिरुपती बालाजीसाठी कोल्हापुरातून विमानसेवा पूर्ववत

indigo airlines

लोकशाही न्यूज नेटवर्क

कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती उड्डाण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. कोविड काळात विमानांच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. अनेक लहान पल्ल्यांची उड्डाणं बंद झाली होती. मात्र परिस्थिती पूर्ववत होत असल्याने आता कोल्हापूर ते तिरुपती बालाजी ही विमानसेवा पूर्ववत होणार आहे. येत्या २५ फेब्रुवारीपासून ही विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे.

इंडिगो कंपनीकडून विमानसेवा पुरवली जाणार आहे. 24 मार्च 2020 पासून ही सेवा सुरू होईल. त्यामुळे तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी ही खूशखबर आहे. सध्या बंगळुरू आणि हैद्राबादची विमानसेवा सुरू आहे. मात्र, अद्याप कोल्हापुरातून सेवा पूर्ववत झाली नव्हती. अखेर याला परवानगी देण्यात आली असून भाविकांना थेट कोल्हापुरातून विमानप्रवास करता येणार आहे.

तिरुपती बालाजी आणि करवीर निवासिनीची प्रथा

करवीर निवासिनीला तिरुपती बालाजीकडून येणारा शालू नेसवण्याची परंपरा आहे. दरवर्षी नवरात्रीमध्ये तिरुपतीहून अंबाबाईला शालू येत असतो. यासाठी काही दंतकथा देखील जनमानसात रुजल्या आहेत. त्यामुळे आंध्रप्रदेशातून अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यासाठी आंध्र प्रदेश ते कोल्हापूर अशी रेल्वे सेवा देखील सुरू करण्यात आली. मात्र २०१७ पासून नवरात्रातील ही प्रथा बंद करण्यात आली आहे. अंबाबाईचे महालक्ष्मीकरण केल्याचा सूर काही पुजाऱ्यांनी उमटवला. यानंतर महावस्त्र प्रदान करण्याची परंपरा अद्याप सुरळीत आहे. मात्र भक्तांचा ओघ दोन्ही देवस्थानात सुरू असतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“ड्रग्ज अॅडिक्टला झाशीची राणी बोलताना लाज वाटली नाही का?”

एकेरीत उल्लेख करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे नारायण राणेंनी मानले आभार!