in

उत्तराखंडमधील दुर्घटनेत १००-१५० जण वाहून गेल्याची भीती…रेस्क्यू ऑपरेशन सुरू

लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळल्याने मोठी नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे. रैनी गावातील जोशी मठ परिसरात ही दुर्घटना घडली असून एका धरणाचे नुकसान झाले आहे. यामुळे ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पालाही मोठा फटका बसलाय. मात्र या दुर्घटनेत जवळपास १००- १५० जण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. उत्तराखंडचे मुख्य सचिव ओमप्रकाश यांनी संबंधित माहिती दिलीय.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी रेनी गावातील तपोवन भागाचा आढावा घेतला आहे. इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस, राज्य शीघ्र कृती दल, तसेचर एनडीआरफचे पथक याठिकाणी दाखल झाले आहे. सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली.

दरम्यान, हिमकडा कोसळल्यानंतर निर्माण झालेल्या जलप्रलयाचा नदीकाठांवरील गावांना मोठा फटका बसला आहे. अनेक घरांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत असून, ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टची मोठी हानी झाली आहे. सध्या एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्यांना मदत कार्यासाठी पाचारण करण्यात आलं असून, हेलिकॉप्टरद्वारे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने काठावर असलेल्या गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs ENG : पंत-पुजरा यांच्यावर भारतीय संघाची मदार

नारायण राणे म्हणजे दबंग नेते – देवेंद्र फडणवीस