in ,

भाजपाचे आणखी पाच नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार!

जळगाव महानगरपालिकेतील भाजपचे आणखीन पाच नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार सूत्रांची माहिती. दोन दिवसांपूर्वी जळगाव महानगर पालिकेतील पाच नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर शिवसेनेत प्रवेश केला होता.

यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी पाच भाजपा नगरसेवकांनी प्रवेश केला व आणखीन दोन दिवसात पाच नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले होते . त्या नुसार हे पाचही नगरसेवक आज मुंबईत दाखल झाले असून काही वेळात हे नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मात्र उद्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना त्यापूर्वीच भाजपा चे आणखी 5 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शेतकरी बांधवांना खरिपासाठी कर्ज पुरवठा करणार

Video viral | सासू-सुनेच्या भांडणात निर्दयी आईकडून चिमुकल्याला मारहाण