in

पुणे केमिकल आग दुर्घटना प्रकरण; राज्यसरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला लागल्याच्या भीषण आगीत १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेत पंतप्रधान कार्यालयाकडून मदत जाहीर झाल्यानंतर आता राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून ट्वीट करून, पुण्यातील एका कारखान्यात लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकास ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून’ 2 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे. जखमी व्यक्तींना 50,000 रुपये भरपाई देण्यात येणार आहे. यांनतर आता मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

नेमकी घटना काय ?

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा मृत्यू झाला असून, काही कामगार बेपत्ता आहेत. तर, १९ कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे. या कंपनीत केमिकल बनवण्याचे काम सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. आग लागल्याची माहिती समजताच पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Price Today| पाहा सोन्याचे आजचे भाव

Maharashtra Corona; महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा घसरला, 10 हजार 219 नवे रुग्ण