in

महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात दोन महिने मासेमारी करण्यास बंदी

सागरी मासळी साठ्यांचे जतन होण्यासाठी तसेच पावसाळ्यात मच्छिमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी 1 जून ते 31 जुलै 2021 या कालावधीत राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली असल्याचा आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने काढला असून मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी याबाबत माहिती दिली आहे.

जून व जुलै महिन्यात मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारीस बंदी घातल्यामुळे मासळीच्या बीजनिर्मितीच्या प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते. तसेच या कालावधीत वादळी हवामानामुळे मच्छिमारांची जिवीत व वित्त हानी होऊ नये. यासाठीही ही बंदी घालण्यात आली आहे, परंतु याकाळात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांसाठी बंदी नाही असेही अस्लम शेख यांनी स्पष्ट केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विद्या बालनच्या ‘शेरनी’चा टीझर झाला रिलीज

Live Update | मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या रांगा