in

भिवंडीत मॅरेज हॉलला भीषण आग; अनेक वाहनांचा कोळसा

भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात अंसारी मॅरेज हॉल मध्ये भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. लग्न सोहळा सुरू असताना या ठिकाणी लावलेल्या फटाक्याची ठिणग्या मंडप साहित्यावर उडाल्याने भीषण आग लागली. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

विवाह सोहळ्यादरम्यान वाहन पार्किंगच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत फटाके लावले होते. फटाक्यांची आतिषबाजी करतांना मंडपाला आग लागली. त्यानंतर हळूहळू ही आग पसरून वाहन पार्किंग ठिकाणी असलेल्या 20 ते 25 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन दलाच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून स्थानिक पोलीस ठाण्यात या आगीची नोंद करण्यात आली आहे.

भिवंडीत मोकळ्या जागेत अनेक व्यावसायिकांनी अशा प्रकारे मॅरेज हॉल थाटले आहेत. मात्र सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने भविष्यात जीवितहानी होण्याची मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून मनपा प्रशासन त्याकडे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात पुन्हा निर्बंध? राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

महाराष्ट्रातील शाळा १ डिसेंबरला सुरु होणार का?; राजेश टोपे म्हणाले…