शिरूर तालुक्यातील पंचतारांकित असलेल्या रांजणगाव एमआयडीसी महाराष्ट्र इन्व्हायरो पावर लिमिटेड या कंपनीला भीषण आग लागली आहे. ही कंपनीत हानिकारक कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम करत असून वर्षभरात या कंपनीला दुसऱ्यांदा आग लागलीय. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झाल्याची माहितीदेखील समोर येत आहे.
Comments
Loading…