in ,

दसऱ्याच्या पार्श्वभुमीवर जाणून घ्या सोने- चांदीचे दर

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. काल दसरा असून त्याची लगबग सराफा बाजारात सुरु होती. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली आहे. सराफा बाजारात सोन्याचा भावात ६८० रुपयांची वाढ झाली होती. तर कमॉडिटी बाजारात सोने ४८ हजारांवर गेले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोने खरेदी साधारण 25 टक्क्यांनी वाढली आहे.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार आज मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,०७० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,०७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,०९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,३५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,०७० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,०७० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६३६ रुपये आहे. कालच्या आणि आजच्या दरामध्ये ४ रुपयांचा फरक आहे.

गेल्यावर्षी करोना संकट आणि जागतिक अस्थिरतेने सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. गेल्या दसऱ्याला प्रति तोळा 50,500 रुपये असलेले सोन्याचे भाव यंदा घसरून घाऊक बाजारात प्रति तोळा 47070 रुपयांवर उतरले. त्यामुळे ग्राहकांमध्ये सोने खरेदीसाठी उत्साह दिसून आला. मात्र यंदाच्या दसऱ्याला एकट्या मुंबईत ४०० कोटींची सोने खरेदी झाली आहे. मागील दीड वर्षात अनेकांना सोने खरेदी करता आले नाही. त्यात गेल्या वर्षभरात केलेल्या काटकसरीमुळे जमा झालेल्या पैशांतून यंदा नागरिकांनी भरपूर प्रमाणात सोन्याची खरेदी केली. त्यामुळे यंदाचा दसरा व्यापाऱ्यांसाठी आनंद द्विगुणित करणारा ठरला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नाशिकमध्ये एटीएमवर चोरट्यांचा डल्ला

शिवसेनेनं वाहनचालकांना वाटले झंडू बाम आणि मास्क