in

लॉकडाऊनमध्ये जाणून घ्या Airtel चे तीन स्वस्त प्लॅन

Share

भारती एअरटेल कंपनीने तीन नवीन स्वस्त प्लॅन लॉन्च केले आहेत.या प्लॅनमध्ये युजर्सना लॉकडाऊनमध्ये डेटाशिवाय Zee5, Wynk Music आणि Airtel XStream या सेवाही मोफत वापरण्यास मिळणार आहेत.

99 रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या 99 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 1GB डेटा, फ्री कॉलिंग आणि 100 SMS चाही लाभ मिळेल. तसेच 18 दिवस या प्लॅनची वैधता असेल. हा प्लॅन बिहार, झारखंड, कोलकाता, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडीशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये उपलब्ध आहे.

129 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सेवा 99 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच आहेत. पण याची व्हॅलिडिटी 24 दिवस असून यात एकूण 300 SMS पाठवता येतात. 129 रुपयांचा हा प्लॅन आसाम, बिहार, झारखंड, गुजरात, हरयाणा, केरळ, कोलकाता, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा, नॉर्थ ईस्ट, ओडीशा, राजस्थान, उत्तर प्रदेश (काही भाग) , उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये उपलब्ध आहे.

199 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1GB डेटा मिळतो. 24 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 SMS चा लाभही मिळेल. हा प्लॅन आसम, बिहार, झारखंड, गुजरात, हरयाणा, केरळ, कोलकाता, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा, नॉर्थ ईस्ट, ओडीशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड व पश्चिम बंगालमध्ये उपलब्ध आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

लॉकडाउन इफेक्ट: यावर्षी महाराष्ट्रात कोणतीही शाळा फी वाढ करणार नाही