in

‘समाजवादी विचारांनी आपल्यावर अन्याय केला’

लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज मुंबई दौऱ्यावर आहेत. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी अर्थ जगतातील विविध विषयांवर चर्चा झाली. कोव्हिडवर अधिभार लावला नाही. तसंच निर्गुंतवणुकीला पर्याय नाही, असं मत यावेळी बोलताना अर्थमंत्री सीतारमण यांनी व्यक्त केलं. त्या अर्थक्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधत होत्या.

समाजवादी विचारांमुळे आपलं मोठं नुकसान झालं. समाजवादी विचारांनी आपल्यावर अन्याय केला, असा आरोपही यावेळी सीतारमण यांनी केला. १९९१ नंतर सरकारनं काहीचं केलं नाही. त्यावेळी भारतीय उद्योजकांवर अन्याय झाला मात्र त्यांनी हार मानली नाही, असेही सीतारमण यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पानंतर खूप टीका झाली. मात्र, आम्ही सगळं काही विकायला काढलं नाही. निर्गुंतवणकीला पर्याय असू शकत नसल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या. करदात्यांनी (टॅक्स पेअर) चिंता करायची गरज नाही. करदात्यांचा प्रत्येक पैसा काळजीपणे वापरला जाईल. करदात्यांचा एक पैसाही व्यर्थ जाणार नाही, असेही सीतारमण यांनी सांगितलं.

केंद्र सरकारनं कोव्हिड अधिभार लावला नाही. देशाला अजूनही २० स्टेट बँकांची गरज आहे, असेही सीतारमण यांनी सांगितलं. घरातलं सोनं ही ताकद असावी, असंही त्या म्हणाल्या. कोरोना काळात अर्थव्यवस्थेला सावरणं हे आमच्यासमोरील मोठं आव्हान असल्याचंही यावेळी सीतारमण म्हणाल्या. तुमच्या प्रत्येक रुपयाची मला किंमत आहे, असेही सीतारमण म्हणाल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनचा अपघात

अमित शाह सिंधुदुर्गमध्ये दाखल; नारायण राणेंचं शक्तीप्रदर्शन