in ,

गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क

जेजुरीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं. हे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण गोपीचंद पडळकर यांना महागात पडलं आहे. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन यासोबतच शासकीय कामात अडथळा आणणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे आणि पोलिसांशी झटापट केल्याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेजुरी गडावरील अहिल्याबाईंच्या पुतळ्यांचं आज उद्घाटन करण्यात आलेलं असून, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन करवून घेतलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन उद्या होणार होते, मात्र त्या आधीच शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी मेंढपाळांच्या हस्ते केलंय.


या कार्यक्रमाच्यावेळी गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले की, शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचं उद्घाटन होऊ नये, अहिल्यादेवींचं काम बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी होतं. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये. असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. या कार्यक्रमाच्यावेळी राज्यभरातील शेकडो बहुजन कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुणे आत्महत्या प्रकरण : गुन्हेगार पर्यटनासाठी मंत्रालय नंबर वन, निलेश राणेंची बोचरी टीका

IPL 2021: 292 खेळाडूंचा होणार लिलाव, ‘या’ खेळाडूंची नावे यादीत