in ,

कंगनाविरोधात FIR दाखल करा, वांद्रे कोर्टाचा मुंबई पोलिसांना आदेश

Share

वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणी वाढणार आहेत. कारण वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना कंगना रणौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिले आहेत.

कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करत आहे. तसेच हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढही निर्माण करत असल्याचे आरोप करत दोन व्यक्तींनी वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात याचिका दाखल केली होती. यावेळी कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर केले होते.

याचिकाकर्त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. यावेळी वांद्रे कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत कंगनासोबत तिची बहीण रंगोलीविरोधीतही एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

NEET Result 2020 : नीट परीक्षेचा निकाल जाहीर; शोएबने रचला इतिहास

Rain Update | राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा कहर !