in

विना मास्कवरून क्लिनअप मार्शल आणि पर्यटकांमध्ये हाणामारी

मुंबई अस्वच्छ करणाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी पालिकेने नेमलेले क्लीन-अप मार्शल पर्यटकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यांच्या विरोधातील तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबईच्या जूहू चौपाटी येथे विनामास्क फिरत असलेल्या पर्यटक आणि क्लिनअप मार्शल यांच्यामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.

मुंबईबाहेरून आलेल्या पर्यटकांना क्लीन-अप मार्शल काय हे माहीत नसते. एखादा पर्यटक हाताला लागला की, हे क्लीन-अप मार्शल त्यांना मुंबई पोलिस कायद्यांतर्गत कारवाईची भीती दाखवतात. कायद्याच्या कचाट्यात अडकण्याच्या भीतीने पर्यटक दंडाची रक्कम देऊन टाकतात. दरम्यान आज मुंबईतील जुहू चौपाटी वर क्लीनअप मार्शलकडून मास्क न घातल्यामुळे कारवाईचा बडगा उचलण्यात आला. त्यामुळे पर्यटक आणि मार्शल यांच्यामध्ये बाचाबाची झाली. क्लीनअप मार्शल गुंडगिरी करत असल्याचा आरोप पर्यटकांडून होत आहे. कायदा हातात घेऊन गुंडा गिरी करणाऱ्या या क्लीन-अप मार्शल वर मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई पोलीसांनी कारवाई करावी अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हे राज्य तुमच्या घरचे नव्हे… तर कायद्याचे!

पेट्रोल डिझेलचे वाढते दर अन् सोशल मीडियावर नेटिझन्स सक्रिय…